मांगरुळजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

4 जण जखमी, चंद्रपूर येथे उपचार सुरू

सुरेश पाचभाई, बोटोणी: मांगरुळ जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार व्यक्ती जखमी झाल्यात. मंगळवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील सुनील पांडुरंग नागरे (३२) हे दुचाकी क्र. एम एच २९ ए एच ९८३३ वर पत्नी व मुलीला घेऊन वणीवरून करंजी कडे दुचाकीने जात होते. दरम्यान संदीप बोंडे (४०) रा. कुंभारी ता. घाटंजी हा दुचाकी क्र.एम एच २९ ए व्ही ५०७४ मारेगाव वरुन वणीकडे जात होता.

रात्री ७:३० वाजे दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील चारही व्यक्ती जखमी असून जखमींना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

गोरज येथील विवाहित तरुण 4 महिन्यानंतरही बेपत्ताच

थरार: 45 लाखांच्या दरोड्यातील आरोपीला राजस्थानमधून अटक

Comments are closed.