सुशील ओझा, झरी : तालुक्यात एक वर्षांपासून दारू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बोगस दारू विक्री होत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील सतपेल्ली येथून वठोली ते तेलंगणात दारूचा पुरवठा होत केल्या जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाल्यापासून सतपेल्ली येथून वठोली ते तेलंगणात व परिसरात देशी दारूची तस्करी होत आहे. अशोक नामक व्यक्ती रोज ३० पेटीच्यावर पोहचवत असल्याची माहिती आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभाग अर्थपूर्ण सबंधातून दुलक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक लोक करीत आहे.
झरी येथे चार बीयर बार असून, एका बारमध्ये बोगस दारूचा महापूर आला आहे. मुकूटबन येथील तीन बियरबार दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम इंग्लिश दारूची तस्करी आलिशान वाहनातून होत आहे. सदर दारू तस्करी करीत ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी मदत करीत असल्याचे कुणकुण आहे. ज्यामुळे पोलीस व अबकारी विभाग कर्तव्य कोणाचे बजवीत आहे हा एक प्रश्नच उपस्थित होत आहे. तालुक्यातील बारमध्ये इंग्लिश दारू, बीयर वर ३० रुपयांपासून तर ४०० रुपयांपर्यंत जास्त दर आकारून पैसे वसूल करतांना पहायला मिळत आहे. तर देशी दारू दुकानदार ५२ चा पवा ५५ ते ६० रुपयांपर्यंत घेत आहे. सदर दारू दुकानदार नियम धाब्यावर बसवून लूट करीत आहे.
देशी व इंग्लिश दारू दुकानातून दररोज ४० ते ५० पेटी देशी दारू आलिशान गाडीने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाला व पोलिसांना पूर्ण माहिती असून, झोपेचे सोंग घेऊन आहे. दारूच्या व्यसनाने शेतकरी कर्जात बुडत आहे. तर तरुण व अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहे. दारूच्या वयासनाने शेतकरी आत्महतेत वाढ झाली व अनेक तरुण युवकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. युवक व्यसनाधीन होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे वणी, मारेगाव व झरी या तीनच तालुक्यात सर्वाधिक बीयरबार चालक व देशी दारू दुकानदार असून, एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री होत असून, या तीन तालुक्याकरिता शासनाचे नियम वेगळे केले का? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून होत आहे..