एकूण १०६ गावांचा ताण अल्प पोलीस कर्मचाऱ्यांवर

दुर्गा विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

0 172

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत १५८ दुर्गा व शारदादेवीची स्थापना करण्यात आली. विसर्जनाकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यात १०६ गावे असून, १५८ विसर्जनाचा भार मुकुटबन व पाटण ठाण्याच्या अल्प पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे..

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये दोन अधिकारी ठाणेदार धर्मराज सोनुने व पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोडसह ३० कर्मचारी व १५ होमगार्ड आहे. तर पाटण ठाण्यात ठाणेदार अमोल बारापात्रे, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरेसह २८ कर्मचारी व १० होमगार्ड आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत ६७ दुर्गादेवी व ३२ शरदादेवी असे एकूण ९९ देवींची स्थापना करण्यात आली आहे. मुकुटबन शहरात १७ तर ग्रामीण भागात ८२ देवीची स्थापना करण्यात आली आहे. .

पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत शहरात १० तर ग्रामीण भागात ६८ देवीची स्थापना करण्यात आली आहे. दुर्गा व शारदादेवी विसर्जनापूर्वी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत देवी बसविण्यापासून तर विसर्जनापयंर्त मंडळांनी मंडपात कोणकोणती काळजी घ्यावी, भक्ताची गैरसोय होऊ नये, मंडपात अनुचित प्रकार घडू नये, रात्री १० नंतर मोठ्या आवाजात वाद्य किंवा स्पीकर वाजवू नये तसेच विसर्जनादरम्यान लहान मुलांना एकटे सोडू नये, डीजे वाजवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, विसर्जन दरम्यान कोणताही अडथळा निर्माण झाल्यास पोलिसांना कळवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुकुटबन येथे ९ व १० ऑक्टोबर दोन दिवस विसर्जन होणार आहे तर पाटण येथे ९, १० व ११ ऑक्टोबर असे तीन दिवस विसर्जन होणार आहे..

Comments
Loading...