अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

कोसारा शिवारात भीषण अपघात

0 409

पंकज डुकरे, मारेगाव: अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघे ठार झाले. कोसारा शिवारात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बबन जवादे (४६) व कैलास डोंगरे (२७) रा. सोईट अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघेही कामावरून खैरी येथून एम.एच. २९ एन ८७९३ क्रमांकाच्या दुचाकीने कोसारा सोईट गावाकडे जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने जबरदस्त धडक दिल्याने हे दोघेही उसळून खाली पडले.

या अपघातात जवादे हे जागीच ठार झालेत. तर डोंगरे यांचा माढेळी वरोरा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मारेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

Comments
Loading...