दुर्गोत्सवाच्या मूर्ती स्थापनेच्या परवानगीची ऑनलाईन प्रोसेस करा मोफत

तारेंद्र बोर्डे यांचा उपक्रम, जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

वणी बहुगुणी डेस्क: गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मूर्तीची स्थापना करण्यासाठी ऑनलाईन परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धत काहीशी किचकट असल्याने सार्वजनिक मंडळासाठी ही एक डोकेदुखी आहे. मात्र तारेंद्र बोर्डे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस करून दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ त्यांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या जनसंपर्क कार्यालयात भेट द्यावी लागणार आहे. तिथे असलेल्या टेक्निशिअनद्वारा सदर प्रोसेस मोफत करून दिली जाणार आहे.

काय आहे आवश्यक कागदपत्रे?
यासाठी सर्व सदस्यांचे आधारकार्य व पासपोर्ट फोटो, परवानगी ठराव, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी), लाईट बील याची गरज आहे. परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यावर त्याची प्रिंट दिली जाणार आहे.

मंडळाला सदर प्रिंट घेऊन पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर पोलीस ठाण्याकडून परवानगी दिली जाणार आहे. परवाना मंजूर झाल्यावर पोलीस ठाण्याचा त्यावर सही- शिक्का व सूचना पत्र असेल. यंदाचा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. शांततेत व आनंदात सर्वांनी हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तारेंद्र बोर्डे यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्जासाठी संपर्क –
तारेंद्र बोर्डे, जिल्हाध्यक्ष भाजप
यांचे जनसंपर्क कार्यालय
ग्रामीण रुग्णालयाजवळ वणी
मोबाईल नंबर – 866882589, 8329672091, 7249435492

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.