कृषिच्या विद्यार्थीनींकडून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मार्गदर्शन

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत उपक्रम

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील साखरा (दरा) येथील रहिवासी आणि श्री सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय, केसलवाडा ता. लाखनी जि. भंडारा येथील विध्यार्थीनी शिल्पा दिलीप बडवाईक हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत परिसरातील गावांत भेटी देऊन ई-पीक पाहणी ऍपच्या वापरासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने शेतकरी स्तरांवर पीक पाहणी ऍपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ‘माझी शेती माझा सातबारा’ या घोषवाक्याच्या आधारे 15 ऑगस्टला पीक पाहणी करण्याची सुरुवात झाली. मात्र, शेतकऱ्यांना पीक नोंदणी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता कृषिदूत शिल्पा बडवाईक हिने बोपापुर येथील प्रगतिशील शेतकरी संजय देवाळकर, शंतनू देवाळकर तर साखरा येथील वामन नांदे, रमेश खामनकर, वैशाली बडवाईक आदींना पीक नोंदणी कशी करावी, ई- पीक पाहणीचे फायदे आदींबाबत माहिती दिली. सदर अभ्यास भेटीसाठी प्राचार्य डॉ. डी. एच. जीरापुंजे, प्रा. आर. हातझाडे आदींचे मार्गदर्शन मिळाले.

हे देखील वाचा:

गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

गोडगाव शिवारात वाघाचा गायीवर हल्ला, गाय ठार

झरी तालुक्यात रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.