मार्डी येथे म. गांधी व शास्त्री जयंती साजरी

भास्कर राऊत,मारेगाव: मार्डी येथील आदर्श विद्यालयात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल कोंगरे होते. याप्रसंगी शिक्षक विलास ताजने, ज्ञानेश्वर चटकी,  रमेश ढूमने, सुरेश नाखले यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. संचालन ज्ञानेश्वर दातारकर यांनी केले. आभार नितु मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भास्कर जिवतोडे यांची उपस्थिती होती.

Comments are closed.