रोहण आदेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालय संचालित करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. करमसिंग राजपूत यांच्या “स्थूल अर्थशास्त्र” आणि “अधिकोषण’’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. हे पुस्तक प्रकाशन वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव लक्षण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के व भारती राजपूत या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. करमसिंग राजपूत व त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. आतापर्यंत त्यांची 8 पुस्तके प्रकाशित झालीत. या पुस्तकांची नावे सूक्ष्म अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, विदर्भाची कापूस अर्थव्यवस्था, स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, स्थूल अर्थशास्त्र, अधिकोषण ही सर्व पुस्तके विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली आहेत.