अपहरण झालेल्या युवकाने केली स्वत:ची नाट्यमय सुटका

जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला युवक

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात शनिवारी दुपारी त्याच्याच गाडीत बसून एका युवकावर काही सशस्त्र मारेकऱ्यांनी हल्ला केला. या सशस्त्र हल्ल्यातून फिर्यादीने धावत्या गाडीतून पळून कसाबसा आपला जीव वाचविला. आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. जुन्या प्रेमसंबंधातून हा हल्ला झाल्याची ग्वाही फिर्यादीने दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून पाचही आरोपींवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी राहुल दिलीपराव ठाकूरवार (30) रा. देशमुखवाडी वणी हा युवक एका स्थानिक शॉर्टफिल्ममध्ये नायकाचा रोल करत होता. तर याच शॉर्टफिल्ममध्ये यवतमाळ येथील युवती काम करीत होती. चित्रपटात काम करतानाच राहुल व तिच्यात मैत्री झाली. काही दिवसांतच या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनीही केळापूर येथील जगदंबेला साक्षी मानून विवाह केला.

या युवतीच्या घराजवळच विशाल दुबे हा तरुण राहतो. त्याची ओळख राहुलला तिच्या मोबाईलमध्ये फोटो पाहल्यानंतर झाली. सोबतच त्याच्या मित्रांनाही राहुल फोटोवरूनच ओळखतो.30 नोव्हेबर ला तिच्या वाढदिवसानिमित्त राहुल यवतमाळ येथे गेला होता. त्यावेळी विशाल दुबे व त्याच्या सहकाऱ्यांनी राहुलला दम दिला. या घटनेत विशालचे व तिचे प्रेम असल्याचे राहुलच्या लक्षात आले.

25 जुलै ला राहुलच्या काकूंची तेरावी असल्याने राहुल 25 जुलै ला गडचांदूरला गेला. तो 27 जुलैला परत आला. त्यावेळी 26 जुलै रोजी ती यवतमाळ येथे गेली होती. तशी माहिती तिने मोबाईल वरून राहुलला दिली होती. 28 जुलै रोजी राहुल हा गणेशपूर येथून मुकुटबन मार्गे देशमुख वाडीकडे आपल्या वाहन क्रमांक एम एच 29 बी सि 2456 ने जायला निघाला. बसस्थानकाजवल आल्यावर राहुलच्या लक्षात आले की, एक चारचाकी वाहन त्याचा पाठलाग करीत आहे.

रस्त्यात लायन्स कान्व्हेंटजवळ एक लहान मुलगा सायकलने पडल्याने राहुलने गाडी थांबविली. गाडी थांबवताच चालकाच्या बाजूने एका इसमाने वाहनाची काच ठोकली व उघडण्याचा इशारा केला. राहुलने काच खाली करताच मुदस्सरने गाडीची चावी काढली व राहुलला बाहेर ओढले. गाडीतून बाहेर काढून विशाल दुबे यांच्याजवळ आणले. विशाल दुबे ज्या गाडीत बसून होता तीच गाडी क्रमांक एम एच 12 एच डब्लू 3456 राहुलचा पाठलाग करीत असल्याचे राहुलच्या लक्षात आले.

राहुलला काही सुचायच्या आत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. ज्यामध्ये राहुलच्या डोक्याला इजा झाली. सर्वांनी मिळून मारण्यास सुरवात केली. यामध्ये राहुलचा मोबाईल, पावर बँक, गॉगल इत्यादी हिसकावून घेतले. आता राहुलला त्याच्याच गाडीत बसवून यवतमाळच्या दिशेने वाहन चालू लागले. बसस्थानकाजळ हनुमान मंदिराजवळ वाहन स्लो झाले. त्याच्या फायदा उचलत राहुलने स्वतःला गाडीच्या काचेतून अर्धवट बाहेत काढले व आरडाओरडा केली.

“मला वाचवा, पोलिसांना बोलवा” असे म्हणतात बघणारे लोक या ठिकाणी जमा झाले. यावेळी राहुलला त्यातील एकाने पकडून ठेवले होते. परंतु राहुलचा लोक जमा झाल्याने हिंमत वाढली. त्याने कशीबशी सुटका करून त्याच्या गाडीत बसून चालवत गाडी वणी पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांना सर्व प्रकार सांगताच पोलीसानी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणाहून पाच आरोपीस अटक केली. ज्यामध्ये विशाल दुबे, प्रदीप पाली, नीलेश सोनोरे, अमित राहागंडाले, मोहम्मद मुदस्सर सदर पाचही रा. यवतमाळ याच्यावर कलम 395, 324, 365, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री उशिरा पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी वणी पोलीस ठाण्याच्या बाहेर अनेक आरोपींनी गर्दी केली होती. परंतु कोणत्याही दबावाला न जुमानता आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ. नि. मुरलीधर गाडामोडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.