एक आई दुसऱ्या आईच्या रक्षणासाठी सरसावते तेव्हा….

महिलाबचत गटांच्या सहभागातून न.प.चा एक पेड माँ के नाम" उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारत हा मातृसत्ताक देश आहे. इथली संस्कृती ही आई या तत्त्वावर आधारलेली आहे. म्हणूच या देशाला भारतमाता म्हणतात. ही वसुंधरा दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. त्यासाठी वणी नगर पालिका आणि काही महिला बचतगट सरसावलेत. नुकताच 5 सप्टेंबरला जागतिक पर्यावरणदिन साजरा झाला. त्यानिमित्त वणी नगर परिषदच्या माध्यमातून अमृतमित्र आणि दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या उपक्रम राबवलेत. त्या अंतर्गत नगर परिषद शाळा क्र. 7 येथे वृक्षारोपण करण्यात आले .

या कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी क्रांती ज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, सोनाली तिवारी, वृणाली मस्के, दुर्गा विरूळकर, तसेच दक्ष, भोजाजी महाराज, आणि रिया बचत गटांच्या महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. वृक्षारोपणानंतर झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी या महिलांनी घेतली आहे.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार, शिक्षक विजय चव्हाण, शिक्षक दिगंबर ठाकरे, नगर परिषदेचे विविध विभाग प्रमुख, वनपाल विजय पोटे, पंकज येवले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने शाळा स्तरावर हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग प्रमुख ऍड. पौर्णिमा शिरभाते, कार्यक्रमाची प्रशासनिक जबाबदारी नोडेल अधिकारी जयंत सोनटक्के, उत्तम हापसे, व विनोद मनवर यांनी परिश्रम घेतलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.