बहुगुणी डेस्क, वणी: कोण कशासाठी वाद घालेल हे सांगता येत नाही. अनेकदा तर खूपच हास्यास्पद कारणावरून वादंग होताना दिसतात. त्यात काही वेळा कुणी रक्तबंबाळ होतं, तर कधी कुणाचा जीवही जातो. असाच एक प्रकार वणीच्या आयटीआय कॉलनीत शुक्रवार दिनांक 6 जून रोजी दुपारीच्या सुमारास घडला. तुम्हाला बकरा विकणं शोभत नाही, असा नसला उपदेशाचा डोस देणं म्हणा की गम्मत म्हणा वादाचं कारण ठरलं. यात एका व्यक्तिला दोघा-तिघांनी लोखंडी रॉड व दगडानं मारहाण करत जखमी केले.
तक्रारीनुसार, वणीच्या आयटीआय कॉलनीत फिर्यादी अजय मधुकर पायघन (42) कुटुंबासह राहतात. ते शेती करतात. त्यांच्याच वार्डात राहणाऱ्या आरोपी ज्ञानेश्वर निमकर (50), भोलानाथ निमकर (38) यांना ते मागील तीन वर्षांपासून ओळखतात. शुक्रवार दिनांक 6 जून रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास अजय पायघन घरी जात होते. आय. टी. आय. कॉलनीत त्यांना समोरुन दोन इसम मोटर सायकलने बकरा घेऊन जाताना दिसलेत. तेव्हा त्या दोन इसमाना बकरा कुठून आणला, म्हणून पायघन यांनी विचारणा केली. त्या दोन इसमांनी तो बकरा ज्ञानेश्वर निमकर व भोलानाथ निमकर यांच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलं. काही विचारपूस करायची असल्यास त्या दोघांच्या घरी चाला असंही म्हटलं.
तेव्हा अजय पायघन त्या दोन अनोळखी इसमांसोबत ज्ञानेश्वर निमकर, भोलानाथ निमकर यांच्या घरी गेलेत. जाताच त्यांना गमतीत म्हणालेत की उपदेशाचा डोस देण्याच्या उद्देशाने हे कळू शकले नाही, पण तुम्हाला अशा प्रकारे बकरा विकणे शोभत नाही. असं म्हणून पायघन घरी निघून गेलेत. मात्र काही वेळानं ज्ञानेश्वर निमकर, भोलानाथ निमकर व ज्ञानेश्वर यांचा मुलगा त्यांच्या घरासमोर आलेत. तेव्हा ज्ञानेश्वर व भोलानाथ यांनी आवाज देऊन घराबाहेर बोलावल्यानं ते घराबाहेर आलेत.
तेव्हा ज्ञानेश्वर निमकर, भोलानाथ निमकर यांनी अचानक पायघन यांनी शिवीगाळ सुरू केली. ज्ञानेश्वर निमकर याने पायघन यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तोच भोलानाथ याने हातात जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या डोक्यावर हाणला. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर निमकर यांनी मधुकर पायघन यांना जिवाने मारण्याची धमकी दिली.
डोक्याला दगड लागल्याने अजय पायघन जखमी होऊन खाली पडले. तेव्हा त्यांचे वडील मधुकर पायघन, पत्नी व शेजारी तो वाद सोडवण्याकरीता धावून आलेत. नंतर ज्ञानेश्वर निमकर, भोलानाथ निमकर व ज्ञानेश्वर यांचा मुलगा हे तिथून निघून गेलेत. तेव्हा त्यांच्या वडीलांनी व पत्नीने अजय पायघन यांना उपचाराकरिता एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं.
तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारांकरिता ग्रामीण रुग्णालयात रेफर केलं. या प्रकरणी आरोपीविरोधात बीएनएस 2023 कलम 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.
Comments are closed.