स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांच्या पाठीशी आता वसंत जिनिंग फॅक्टरी

शेतकरी मंदिराच्या हॉलमध्ये अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजचं युग हे स्पर्धा परीक्षांचं आहे. कितीतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. वणी परिसरातले अनेक विद्यार्थी त्यासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. मात्र अपुऱ्या साधनांच्या अभावी त्यांची प्रचंड गैरसोच होत आहे. याच मुद्यावर वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या संचालक मंडळानं लक्ष केंद्रित केलं. त्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकमताने वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशीष खुलसंगे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळाने निर्णय घेतला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांना त्यासंदर्भात निवेदन दिले. शेतकरी मंदिर येथील हॉलमध्ये अभ्यासिका सुरू करण्यासाठी 20 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

वणी शहरात ग्रामीण भागासह झरी व मारेगाव तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी व एमपीएससी व इतर क्लासेस करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. शहरात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासिका अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शहरात विवीध ग्रंथ आणि अन्य साधनांनी एक सुसज्ज अभ्यासिका उभी होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील युवकांना याचा मोठा लाभ होणार आहे. यासाठी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशीष खुलसंगे यांनी सर्व संचालकांना सोबत घेऊन वणीचे आमदार संजय देरकर यांची भेट घेतली. अभ्यासिकेसाठी 20 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

यावेळी आमदार संजय देरकर यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिला. अध्यक्ष आशीष खुलसंगे व संचालक मंडळांतील जय आबड, प्राचार्य शंकर वऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, संजय खाडे, अशोक धोबे, रवींद्र धानोरकर, ऍड देविदास काळे, गजानन खापणे, घनश्याम पावडे, विनोद गोडे, अशोक नागभीडकर, राजेंद्र कोरडे, साधनाताई गोहोकार, शारदा ठाकरे, प्रकाश मॅकलवार, भूमारेड्डी बाज्जलावार उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.