जिल्हा परिषदची तयारी करीत आहात? घ्या ‘वणी बहुगुणी’ची मदत

काम तुमचे, प्रसिद्धी आमची... जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इमेज बिल्डिंग करण्याची सुवर्णसंधी

वणी बहुगुणी डेस्क: पायाला भिंगरी लावून फिरलो, जनसंपर्कात कमी नव्हतो, तुफान प्रचार केला, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. तरीही निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर उमेदवारांना जाणवते की “थोडी अधिक मेहनत घेतली असती… योग्य प्रसिद्धी मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता.” पण तेव्हा वेळ हातातून निसटलेली असते. जिल्हा परिषदेची निवडणूक — जी ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखली जाते — अगदी दारात आली आहे. आपण जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत आहात? मात्र आपल्या कार्याला मीडियातून योग्य प्रसिद्धी मिळत नाही? तर परिसरातील नंबर 1 न्यूज पोर्टल असलेल्या ‘वणी बहुगुणी’ वर आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. वेळ निघून जाण्याआधी जागे व्हा…! आताच कामाला लागा, जनतेपर्यंत आपले कार्य पोहोचवा आणि योग्य प्रसिद्धी मिळवा… इमेज बिल्डिंग, इलेक्शन स्ट्रॅटेजी, जनसंपर्क, प्रसिद्धी व  तुमच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आताच  9096133400 (संपादक – निकेश जिलठे) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे इच्छुकांना आवाहन करण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे महत्त्व
जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच ग्रामीण विकासाचा कणा आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, बाजारपेठ, प्रकाश व्यवस्था — नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रत्येक निर्णय याच संस्थांमधून घेतला जातो. त्यामुळे या निवडणुका केवळ राजकीय लढाई नसून गावाच्या भविष्याचा आराखडा ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. निवडून येणारे सदस्य नागरिकांच्या जीवनमानावर थेट परिणाम घडवतात. चांगले प्रतिनिधी निवडले तर विकासाचा मार्ग सुकर होतो; पण दुर्लक्ष झाले तर समस्या वाढतात. तसेच विजयी उमेदवारांच्या पुढील राजकारणाची दिशा ही जिल्हा परिषद ठरवते.   

जनसंपर्क व प्रसिद्धी का महत्त्वाची?
निवडणूक ही फक्त मतदानापुरती मर्यादित नसते. ती एक जनजागृतीची प्रक्रिया आहे. उमेदवार सक्षम असतो. मात्र त्याची माहिती, त्यांचे काम, त्याची भूमिका आणि दृष्टिकोन समजण्यासाठी प्रसिद्धी आवश्यक असते. आजच्या डिजिटल युगात निवडणूक म्हणजे फक्त प्रचार फेऱ्या आणि सोशल मीडिया पोस्टरपुरती मर्यादित राहिलेली नाही. योग्य जनसंपर्क आणि प्रभावी प्रसिद्धी ही विजयाची गुरुकिल्ली ठरत आहे. मतदारांपर्यंत उमेदवाराचे कार्य, दृष्टिकोन आणि भूमिका पोहोचली, तरच विश्वास निर्माण होतो आणि त्यातून उमेदवारांची प्रभावी इमेज बिल्डिंग होते. योग्य प्रसिद्धीमुळे मतदार जागरूक होतात, खऱ्या विषयांवर चर्चा घडते आणि निवडणूक विकासकेंद्रित होते. प्रसिद्धी म्हणजे जाहिरात नव्हे, तर सत्य, काम आणि विचार जनतेसमोर मांडण्याचे माध्यम आहे. 

वणी बहुगुणी हे परिसरातील सर्वाधिक वाचक संख्या असलेला मीडिया असून पोर्टलचे रोजचे 10 ते 15 हजार वाचक आहे. अचूक, सविस्तर व दर्जेदार बातमीसाठी वणी बहुगुणी ओळखली जाते. पोर्लटलची महिन्याला सुमारे 4 ते 6 लाख वाचक संख्या आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात ‘वणी बहुगुणी’ पोहोचले आहे. त्यामुळे निवडणुकीची तयार आपण करीत असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका. अधिक माहितीसाठी 9096133400 (निकेश जिलठे संपादक वणी बहुगुणी) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.