जयंत सोनटक्के अध्यक्ष, वंदना परसावार उपाध्यक्ष तर सचिव पदी जयप्रकाश सूर्यवंशी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपालिका कर्मचारी पतसंस्थेची नुकतीच निवडणूक झाली. यात जयंत सोनटक्के यांची अध्यक्ष, वंदना परसावार यांची उपाध्यक्ष तर सचिव म्हणून जयप्रकाश सूर्यवंशी यांची अविरोध निवड झाली. गेल्या महिन्यात वणी नगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक झाली. यात जयंत सोनटक्के यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला. परिवर्तन पॅनलचे भोलेश्वर ताराचंद, किशोर चौधरी, प्रेमदास डंबारे, विनोद चव्हाण, मुरलीधर कूत्तरमारे, जयप्रकाश सूर्यवंशी, सुनीता जकाते, वंदना परसावर, जयंत सोनटक्के, संजय पवार हे सर्व उमेदवार निवडून आले होते. संचालक मंडळाची निवडणूक लांबली होती. अखेर 6 मार्च रोजी ही निवडणूक पार पडली. नवनिर्वाचित पदाधिका-यांच्या निवडीसाठी अनिल कांबळे, किशोर परसावार, पालवे, शिंदे, जोगी यांचे मार्गदर्शन लाभले. नवीन कार्यकारिणीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.