सततचा वीज पुरवठा खंडित होण्यामुळे झरी तालुक्यातील रहिवाशी त्रस्त
8-10 दिवसांपासून समस्या सुरू, लोकप्रतिनिधी व गावपुढा-यांचे दुर्लक्ष
सुशील ओझा, झरी: पावसाळा सुरू होताच मुकुटबनसह तालुक्यात वितरित होणा-या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. सततच्या वीज गुल होण्यामुळे नागरिक तर त्रस्त झाले आहेत शिवाय वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे विजेवरील चालणा-या उपकरणावर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये ही समस्या उद्भवली आहे.
पावसाळ्यात सतत वाराधुंद सुरू असते. थोडाही वारा सुटला की लाईट गुल होते. याबाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही ही एक शोकांतिका आहे.
तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ अथवा किती दिवस लागेल याची काहीच शास्वती नाही. विजेच्या लपंडाव दरम्यान गुल झालेला वीज पुरवठा सुरू होण्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करण्याशिवाय पर्याय नाहीत मात्र संपर्क केल्यावरही वीज पुरवठा नियमित होण्यास मोठी दिरंगाई केली जात आहे. यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. तरी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
हे देखील वाचा:
सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे