नळ आहे पण पाणी नाही, वीज कनेक्शन आहे पण लाईट नाही…

विजेचा लपंडाव, महावितरण कार्यालयावर काँग्रेसची धडक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते. मात्र त्यानंतर तासंतास वीज पुरवठा खंडीत राहतो. याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वीज गेल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचा आरोप नगर पालिकेकडून करण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे सोमवारी दिनांक 20 काँग्रेसचे संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात सहका-यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत उप अभियंत्याची भेट घेतली. यावेळी तातडीने ही समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले गेले.

भर उन्हाळ्यात अनेक वेळा दिवसा रात्री लाईट जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सातत्याने वीज गेल्याने अनेकांचे विद्युत उपकरणे खराब झाले आहेत. तर दिवसा लाईट नसल्याने इंटरनेट बंद होते. परिणामी अनेकांचे काम थांबतात. त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लाईट बंद असते. याबाबत महावितरणाच्या कर्मचा-यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही दाद मिळत नाही. असा आरोप सर्वसामान्य करीत आहे.

महावितरणमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम
सध्या वणीत भीषण पाणी टंचाई आहे. वीज नसल्याने शहरातील पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचा दावा नगर पालिकेने केला आहे. तसेच पाणी प्रश्नावर वीज वितरणला जबाबदार धरले होते. त्यामुळे संजय खाडे यांच्या नेतृत्तात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धडक देत या प्रश्नावर उप अभियंत्यांना विचारणा केली.

नळ आहे पण पाणी नाही, वीज कनेक्शन आहे पण लाईट नाही…
तांत्रिक अडचणीमुळे विजेची समस्या होती. मात्र ती आता समस्या सोडवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे वारंवार वीज जाणे थांबणार व सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, असा दावा उप अभियंत्यांनी केला, त्यामुळे काही दिवस वाट पाहणार. त्यानंतरही ही समस्या सुटली नाही तर महावितरण कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल – संजय खाडे, काँग्रेस

निवेदन देते वेळी राजाभाऊ पाथ्रडकर, तेजराज बोढे, प्रमोद वासेकर, संजय सपाट, प्रेमानंद धानोरकर, विकेश पानघाटे, साधना गोहोकर, मंगला झिलपे, काजल शेख, अशोक चिकटे, कैलास पचारे, रवि कोटावार, अशोक नागभीडकर, अमित संते, अरुण लांडे, वामन कुचणकर, प्रतिक गेडाम, वामन नागपुरे, रामदास पखाले, सुरेश भारसाकळे, आर एस मालेकर, सुरेश बंसल, संगीता खाडे, बरखा वाधवानी, प्रेमिला पावडे, दर्शना पाटील, मंदा बांगरे, संगिता मांढरे, उज्ज्वला निब्रड, ललिता बरशेट्टीवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.