तिस-या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद

संपामुळे वेकोलिचे कोट्यावधींचे नुकसान

0

जब्बार चीनी, वणी: खासगीकरणाच्या विरोधात कोळसा कामगारांनी पुकारलेला संप शनिवारी तीस-या दिवशीही सुरु होता. जिल्ह्यातील सर्व खाणीत कोणताही कामगार कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे दुस-या दिवशीही जिल्ह्यातील कोणत्याही कोळसा खाणीत उत्पादन होऊ शकले नाही. यामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

दोन दिवसाच्या कडकडीत बंद नंतर आजही वणी व वणी नार्थ क्षेत्रात कडकडीत बंद पाळण्यात आला. या संपूर्ण क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रुग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरव्ही लॉकडाऊन काळातही कोळसा खाण कामगारांनी गजबजलेला हा परिसर आज मात्र निर्मनुष्य दिसत होता.

वेकोलिच्या वणी उत्तर क्षेत्रात येणा-या जुनाड, कोलार पिपरी, घोंसा, उकणी, या ओपनकास्ट आणि भांदेवाडा भूमीगत अशा सर्व पाच खाणीतीन कोळसा व माती उत्खनन रेत पर्णपणे बंद होते. येथील तीन खाणीत खासगी कंत्राटदारामार्फत सुरू असलेले माती उत्खनन ही बंद होते. कोळशाची रेल्वे व खासगी ट्रकव्दारे होणारी पूर्ण वाहतूक ठप्प होती. आजही कामगार घरूनच निघाला नसल्याने केवळ अधिकारी तेवढे कामावर होते.

काम बंद झाल्याने वेकोलिचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या कोळसा कामगार संघटनांनी हा विषय कामगारापर्यंत अत्यंत प्रखरपणे पोहोचविल्याने व त्याचा यथायोग्य प्रचार झाल्याने कामगार स्वयंस्फुर्तपणे या संपात सहभागी झाले, हे विशेष.

अत्यावश्यक सेवाही बंदच
शुक्रवारी संपाच्या दुस_या दिवशीही अत्यावश्यक सेवा विद्युत , पाणी पुरवठा , वैद्यकीय सुविधा यामध्ये काम करणारे कर्मचारी कामावर आले नाहीत . प्रथम , द्वितीय व तृतीय रात्र पाळीतही कामगार संघटनांचे नेते पदाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते . कुठल्याही स्थितीत संप शंभर टक्के यशस्वी करण्याचा इंटक , आयटक , बीएमएस , एचएमएस व सिटू या पाचही कामगार संघटनांच्या सैययद सरफराज, अशोक गोटे, सुनिल मोहीतकर, विलास काळे, अरूण सिंग, विजय वाघमारे, दीलीप खाडे,अशोक मेंढे, राजेंद्र चोरघडे, शंकर एडलावार या नेत्यांचा निर्धार आहे.

वेकोलि कामगारांच्या खासदारांचा आंदोलनाला समर्थन
केंद्र सरकारतर्फे कोळ इंडिया लिमिटेडचे कोळसा उत्खननासाठी देशी – विदेशी खासगी पुंजीपतीना परवानगी देण्याच्या निर्णयाला आमचा प्रखर विरोध आहे . या निर्णयाविरोधात उतरलेल्या कोळसा कामगार क्षेत्रातील पाचही संघटनांनी पुकारलेल्या संपाला आपले समर्थन असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू थानोरकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.