सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालूक्यातील सरस्वती माध्यमिक विदयालय मुकूटब, या शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षी माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ९५.३१ टक्के लागला. वर्ग दहावीमध्ये एकूण ६४ विदयार्थी परीक्षेला बसले त्यापैकी ६१ विदयार्थी उत्तीर्ण झाले यात २२ विदयार्थी प्राविण्याने, २७ विदयार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले.
कु. मृदुला संजय बोधे हीने ९३.४० टकके गुण प्राप्त करून प्रथम आली. श्रेया विनोद खडसे ८९.०० टक्के, स्वेता नामदेव खडसे ८७.८० टक्के, श्रेया प्रकाश ठमके ८६.२० टक्के, प्राची गंभीर नरांजे ८६.०० टक्के गुण मिळाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली.
जय बजरंग शिक्षण संस्थाचे संचालक श्री. गणेशभाऊ उदकवार सर यांनी सर्व ऊतीर्ण विदयार्थी याचे कौतुक करून उज्वल जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जोगी ,शिक्षक जिटटावार ढाले , पुनवटकर , कुमरे मॅडम, यमजलवार बाबू, बंडू ताडशेट्टीवार, अरविंद चेलपेलवार, कुणाल नागभिडकर, यांनी शुभेच्छा दिल्या.