चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या
भाजपचे आमदारांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
विवेक तोटेवार, वणी: सोमवार 26 ऑक्टोबर रोजी मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय व्यक्तीने 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी याकरिता वणीचे आमदार व भाजप कार्यकर्ते एकवटले आहे. त्यांनी आज गुरुवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी मार्फ़त जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आज संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणी निवेदन देण्यात आले. तसेच 31 ऑक्टोबरला मारेगाव येथे भाजपतर्फे मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्यातील धामणी या गावात घरी कुणीच नसताना एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. तिचे आईवडील हे कापूस वेचण्यासाठी शेतात गेले असतांना त्याने हे कृत्य केले. या प्रकरणी आरोपी नराधम बंडू पांडुरंग भडके याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की यवतमाळ जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र सरकारने गृहखाते महिला संरक्षण करण्यात कमी पडत आहे. जर महिलांवर होणारे अत्याचार थांबले नाही व आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, सभापती संजय पिंपळशेंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते, श्रीकांत पिदूरकर, मंगला पावडे, संध्या अवताडे, नगरसेवक राकेश बुग्गेवार व भाजप कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)