अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची तालुका कार्यकारणी गठित 

सर्वाधिकारा म्हणून शेंडे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून गुरनुले

0
सुशील ओझा, झरी: बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पिवरडोल येथिल पिवराई माता संस्थान  येथे अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाची तालुका कार्यकारिनी गठित करण्यात आली. त्याप्रसंगी यवतमाळ. जिल्हा श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी पद्माकरजी ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रितम सोनवने, अशोकराव भेंडाळे, रमेश पोतराजवार यांच्यासह आजिवन प्रचारक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थणा गिताने करण्यात आली. पस्थित मान्यवरांनी मनोगत व मार्गदर्शनपर भाषणे दिले. नंतर कार्यकारिणी गठित करण्यात आली. झरी तालुका सर्वाधिकारी म्हणून संतोष उरकुडा शेंडे रा. पिवरडोल व तालुका प्रचारप्रमुख म्हणून  प्रविण नामदेव गुरनुले रा. गवारा यांची तर उप सर्वाधिकारी म्हणून पुरुषोत्तम पेटकुले रा. पवनार यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त झालेल्या पदाधिका-यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याप्रसंगी झरी तालुक्यातील बहुतांश गुरूदेव सेवक उपस्थित होते. पाहुणे म्हणून पिवरडोल येथील सरपंच  यादव वाढई, उत्तम भोयर पोलीस पाटील, श्रीधर गुरनुले, भिवसन गुरनुले, उरकुडा शेंडे, कांचन शेंडे, संतोष राऊत, दीपक भेंडाळे,गोविंदा ठाकरे, विठ्ठल गुरनुले, अशोक वाडगुरे, राजु चौधरी, दीपक चौधरी,विठ्ठल महाडोळे, तसेच कारेगाव येथील गोपाळ गुरनुले उपस्थित होते. पद्माकरजी ठाकरे जिल्हा सर्वाधिकारि व मान्यवराचे शाल व श्रीफळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Leave A Reply

Your email address will not be published.