साखरा (दरा) येथील शेतक-याची शेतात आत्महत्या

पहाटेच्या सुमारास कीटकनाशन प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी:- तालुक्यातील साखरा (दरा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रामदास माधव चौधरी (50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक रामदास हा झरी तालुक्यातील कुंडी येथील रहिवासू आहे. मात्र मागील काही वर्षापासून तो कुटुंबासह आपल्या सासरवाडी साखरा येथे राहत होता. रामदासच्या पत्नीच्या नावाने 3 एकर शेती आहे. रामदासला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा शिक्षण घेत आहे तर मुलगी लग्नाची असून स्थळ शोधणे सुरू आहे.

मंगळवार 28 डिसेंबर रोजी रामदास पहाटेच उठून शेताकडे निघून गेला. सकाळी 6.30 वाजता दरम्यान रामदासचा साडभाऊ शेताकडे गेला असता त्याला रामदास निपचीत पडून दिसला. त्यांनी याबाबत लगेच गावात येऊन माहिती दिली. शेतकरी आत्महत्येची घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनस्थळ पंचनाम्यात रामदास यांच्या मृतदेहजवळ मोनोसील नावाचे कीटकनाशकाची शिशी आढळून आली. रामदासला ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रामदास यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याबाबत अद्याप कळू शकले नाही.

हे देखील वाचा:

शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

पर्यावरणाचा संदेश घेऊन वणीत निघाली सायकल रॅली

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.