मारेगाव तालुक्यात विजेचा तांडव, वादळी वा-यासह पाऊस

वीज पडून शेतक-याचा मृत्यू, नगर पंचायत भवन क्षतीग्रस्त

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बुधवारी दुपारी मारेगाव तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. यात मारेगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी विनोद केशव किनाके (38) रा. साखरा यांचा मृत्यू झाला. तर मारेगाव येथील नगर पंचायत भवनवर वीज पडल्याने भवन क्षतीग्रस्त झाले.

बुधवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मारेगाव तालुक्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस आला. यात कुंभा शिवारात जगन जोगीराम परचाके यांच्या शेतात काम करत होता. दुपारी चार वाजताच्या दरम्यान विनोद डवरणी करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने विनोद किनाके यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्नालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले,

ग्रामीण रुग्नालयास मारेगावचे तहसिलदार दीपक पुंडे, नायब तहसिलदार दिगांबर गोहोकर, मंडळ अधिकारी शेळके, कुंभा येथील तलाठी घोटकर, सुर्वे तलाठी यांनी तात्काळ भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. मृतक विनोद किनाकेच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

नगर पंचायतीच्या भवनवर वीज पडल्याने नुकसान
नगरपंचायतच्या नविन इमारतीवर विज पडल्याने इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले. मारेगाव शहरात नव्यानेच दोन कोटी रुपये खर्च करून नगर पंचायत भवन बांधण्यात आले आहे. मात्र यावर वीज पडल्याने इमारतीचा एक कोपरा क्षतीग्रस्त झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. विशेष म्हणजे अजून पर्यंत या नवीन इमारतीचे उद्घाटन झालेले नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.