शेतात काम करीत असताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मारेगाव तालुक्यातील डोल (डोंगरगाव) येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील डोल (डोंगरगाव) येथे एका शेतक-याला शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी संध्याकाळी घडली. सुरेश बोरकर (54) असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरेश बोरकर (54) हे डोल (डोंगरगाव) येथील रहिवाशी होते. त्यांचे परिसरातच शेत आहे. शनिवारी ते शेतात काम करीत होते. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास बंड्याच्या डागडुजीचे काम करित असताना त्यांना बंड्यात असलेल्या जिवंत तारांचा करंट लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. मयत शेतकऱ्याच्या मागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काल संध्याकाळी सोमनाळा येथील एका व्यक्तीचाही छतावर विजेचा करंट आल्याने त्याचा शॉक लागून मृत्यू झाला होता.

हे देखील वाचा:

‘जेसीबी की खुदाई’ पडली महागात, डोळ्यादेखत चोरली दुचाकी

स्थानिक कलाकारांची शॉर्ट फिल्म ‘रेडियो 1947’ चा टिझर प्रकाशित

Leave A Reply

Your email address will not be published.