टाकळी (कुंभा) येथे कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
गुलाबी अळीच्या प्रकोपाने घेतला शेतक-याचा जीव
रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील शेतकरी रवींद्र गौतम पोंगडे यांनी वीष प्राषण करून आत्महत्या केली. गुरूवार दिनांक 7 डिसेंबरची ही घटना आहे. शेतीमध्ये उत्त्पन्न न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.
रविंद्र पोंगडे हे त्यांच्या वडिलांची 3 एकर शेती करत होते. त्यांच्या शेतामध्ये कपाशीचे पीक होते. यावर्षी कपाशीवर गुलाबी अळीने हैदोस घातला. त्यामुळे त्यांचे पीक बुडाले. त्यांच्यावर खासगी कर्ज होते. शेतात पीक झाले नाही त्यातच कर्ज यामुळे त्यांनी गुरुवारी विष प्राशण केले.
रविंद्र यांनी विष प्राषण केल्यामुळे त्यांना मारेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र यांच्यामागे पत्नी, पाच वर्षांचा मुलगा व आठ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.