साख-यातील शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

सततची नापिकी व कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या?

बहुगुणी डेस्क, वणी: साखरा (दरा) येथील एका अल्पभूधारक शेतक-याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज शनिवारी दिनांक 9 मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वासुदेव किसन नांदेकर (अंदाजे 44) असे मृत शेतक-याचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वासूदेव हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. सकाळच्या सुमारास ते शेतात निघाले. शेताजवळ त्यांनी विषारी औषध प्राशन केले. दरम्यान परिसरातील एका मजुराच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने याची माहिती वासूदेवच्या भावाला दिली.

सर्व शेतात पोहोचले. वासूदेव यांची प्रकृती गंभीर असल्याचे आढळले. त्यांनी वासूदेवला त्वरित वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. सततच्या नापिकी आणि कर्जामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

Comments are closed.