तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभरा नाफेडने मागील दोन महिन्यांपूर्वी खरेदी केला. बहुतांश शेतकऱ्यांचा चणा अजूनही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात पडून आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी केला.
त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. शासनाकडून बोंडअळी व पीकविम्याची रक्कम देण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे सेनेने तहसील कार्यालयावर धडक दिली. तत्काळ कारवाई न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी चंद्रकांत घुघुल यांच्यासह संतोष माहुरे, संदीप विंचू, सतीश आदेवार, विनोद उप्परवार, शेख हसन, फैजल शेख, दयाकर गेडाम, अशोक बरपटवार, गणेश दोरशतवार, रवींद्र पवार, गजानन वहिले उपस्थित होते..