5 दिवसांपासून प्रशासनाची उपोषणाकडे पाठ

शहरातील कॉईन बॉक्स बंद करण्याची मागणी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेला कॉईन बॉक्स बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 मार्च पासून येथील तहसील कार्यालय समोर आकाश कामटकर या युवकाने उपोषण सुरू केले आहे. मात्र आज उपोषणाचा 5 वा दिवस असतानाही याकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असून प्रशासन उपोषणाची कुठलीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आकाश कामटकर हा युवक कॉईन बॉक्स चालकाकडे महिनेवारीने कामावर होता. युवकाने वारंवार कामाचा मोबदला मागीतला पण मालकाने पैसे न दिल्याने आकाशने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कामाचा मोबदला देण्यात यावे तसेच मनोरंजनाच्या नावाखाली सुरू असलेला कॉईनबॉक्स तात्काळ बंद करावा अशी मागणी उपोषणकर्त्याची आहे.

कॉईन बॉक्स (कसिनो) बंद करण्याच्या मागणी साठी आकाश कामटकर या युवकाने गेल्या 11 मार्च पासून तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाने युवकाची प्रकृती नाजूक होत चालली आहे. मात्र याची प्रशासनाने कुठलीही दखल न घेता याकडे पाठ फिरवली आहे.

उपोषणाची दखल न घेणे चुकीचे: कामटकर
शांततेच्या मार्गाने एखाद्या मागणीसाठी उपोषण करणे हा संवैधानिक हक्क आहे. आज उपोषणाचा 5 वा दिवस असताना प्रशासनाकडून माझ्या उपोषणाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. या कॉइन बॉक्समूळे शहरातील अनेक युवकाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यापूर्वी सदर कॉइन बॉक्स बंद करण्यासाठी अनेक निवेदन प्रशासना कडे देण्यात आले. मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही. कॉइन बॉक्स बंद झाल्या शिवाय मी माझे आमरण उपोषण मागे घेणार नाही.
– आकाश कामटकर, उपोषणकर्ता

हे देखील वाचा:

रोहींचा कळप आडवा आल्याने दुचाकींचा विचित्र अपघात

बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

 

Leave A Reply

Your email address will not be published.