‘तुझा नवरा आजारी असतो, तो काहीही कामाचा नाही…’

चुलत सास-याने केला सुनेचा विनयभंग... गुन्हा दाखल....

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात महिलेचा खुद्द सासऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी त्वरित गुन्हे दाखल करून आरोपीस अटक केली आली.

तक्रारीनुसार, डोंगरगाव तेथील महिला खासगी काम करून आपला उदरनिर्वाह करते. महिलेचा चुलत सासरा हा गेल्या आठ महिन्यांपासून पीडितेवर वाईट नजर ठेवून होता. तसेच महिला शौचास जाताना तिचा पाठलागही करायचा. एकदा आरोपीने घरात कुणीही नसताना महिलेच्या घरी प्रवेश केला. तुझ्या पतीचे किडनी खराब झाले आहे. तो कोणत्याही कामाचा नाही असे म्हणून सुनेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

एक हजार रुपये देतो, उन्हाळ्यात भरपूर पैसा देतो असा बोलला. महिलेनने मी तुमची सून आहे असे सांगून अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु सासरा खूप मागे लागला. अखेर त्याने महिलेजवळ शरीरसुखाची मागणी केली.

24 सप्टेंबर रोजी महिलेचा पती चंद्रपूर येथे उपचार करिता गेले असता महिलेला एकटी पाहून 1.30 वाजता दरम्यान घराच्या खिडकी जवळ येऊन अश्लील चाळे करीत वाईट उद्देशाने शरीर सुखाची मागणी केली. महिलेने विरोध केला असता सदर गोष्ट कुणास सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

अखेर पीडित महिलने याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सास-यावर कलम ३५४ (अ) ( २), ३५४( ड) (१) ,५०४ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व राम गडदे करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.