निश्चित ध्येय असेल तर हमखास यश – प्रतिक बोर्डे

धनोजे कुणबी सभागृहात सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ध्येय निश्चित असेल व त्याला परिश्रमाची जोड असेल तर कुठलेही आर्थिक पाठबळ नसतानाही स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येऊ शकते असे प्रतिपादन प्रतिक बोर्डे यांनी केले. साधणकरवाडी येथील धनोजे कुणबी सभागृहात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 7 ऑगस्ट रोजी धनोजे कुणबी समाज संस्था वणीद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नुकतेच प्रतिक हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात 10 वे आलेत. सध्या त्यांची कोरपना येथे नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 10 वी 12 वी चे प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तारेंद्र बोर्डे, प्रा. टिकाराम कोंगरे, अरूणा खंडाळकर, संजय खाडे, अरुण एकरे, संजय ठावरी, सुभाष तुरानकर, राजेश पहापळे, राजेश पेचे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा व तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. 

अध्यक्षीय भाषणातून डॉ. भालचंद्र चोपणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तारेंद्र बोर्डे यांनी प्रशासकीय क्षेत्रातही आपण पुढे येऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिक यांचा आदर्श पुढे ठेवावा असे प्रतिपादन केले. टिकाराम कोंगरे यांनीही मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावीतील 28 तर बारावीतील 79 विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनोजे कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राजेश पहापळे यांनी केले तर संचालन सचिव संजय पेचे यांनी केले. सत्कार समारंभाचे संचालन स्वाती ठेंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसचिव अशोक चिकटे, मार्गदर्शक प्रा बालकृष्ण मोहितकर, गोविंद थेरे, प्रमोद वासेकर, पुंडलीक ठावरी, संजय पोटे, धीरज डाहुले, अमोल टोंगे, पुंडलीक ठावरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम

Comments are closed.