सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मारेगावात पोलिसाचे पथसंचालन
उत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन
जोतिबा पोटे, मारेगाव: गणेशोत्सव, मोहरम, मस्कऱ्या गणपती, दुर्गोत्सव या सणांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मारेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले. या मधून शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी येणाऱ्या सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आले.
या सण-उत्सवा दरम्यान तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात पोलीस विभागाकडून गस्ती परिस्थितीचा आढावा मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.दिलीप वडगावकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्येक बिट जमादारा मार्फत घेण्यात आला. मारेगाव शहरातून पोलिस दलाचे तीन पोलिस अधिकारी १६ पो.काॅ. १७ होमगार्ड पथसंचालनात सहभागी होते. पोलिस विभागाचे वतीने शांतता राखण्याचे आवाहन वणी विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि.दिलीप वडगावकर, सहाय्यक उपनिरीक्षक अमोल चौधरी, गोपनीय विभागाचे पो.काॅ. राहुल ओइंबे सह सर्व पोलिस कर्मचारी पथसंचालनात सहभागी होते.