वणीत विदर्भवाद्यांचे उग्र आंदोलन, टायर जाळून केला निषेध

आंदोलन ताब्यात... आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वेगळ्या विदर्भासाठी आज वणीत विदर्भवाद्यांतर्फे उग्र आंदोलन करण्यात आले. दुपारी रेल्वे फाटकाजवळ रस्ता रोको आंदोलन करीत आंदोलकांतर्फे टायर जाळण्यात आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन उग्र स्वरुप घेत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी आंदोलकांना काही काळासाठी ताब्यात घेतले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ॲड वामनराव चटप व त्यांचे विदर्भवादी सहकारी दिनांक 27 डिसेंबर 2023 पासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणाला बसलेले आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी सध्या विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वणीत देखील हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात प्रा. पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब राजूरकर, राजू पिंपळकर, देवराव धांडे, दशरथ पाटील, अजय धोबे, नामदेव जनेकर, मुक्तानंद भोंगळे, संदीप गोहोकर, होमदेव कणाके, देवा बोबडे, कलाबई क्षीरसागर, धीरज भोयर, दिनेश रायपूरे, राकेश वराटे, अलका मोवाडे, दत्ता डोहे,

संकेत खीरटकार, मंगल तेलंग, अक्षय कवरासे, रितेश बलकी, कृष्णराव भोंगळे, आयुब शेख, मंजुषा तिरपुडे, कमलेश भगत, संजय सोमलकर, शशिकांत बोठे, काशिनाथ देऊळकर, प्रभाकर उईके, सुमन जनेकार, बेबी पिंपळशेंडे, सुषमा पाटील, नितेश तुरानकर, सुजित गाताडे, चंद्रकांत दोडके, मारोती मोवाडे यांच्यासह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

धुमधडाक्यात पार पडला 19 दाम्पत्यांचा सामूहिक निकाह

गौतमी पाटीलच्या ‘कातिल’ अदांनी वणीकर घायाळ, प्रेक्षकांची तूफान गर्दी

Comments are closed.