जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील टागोर चौक जवळ एका घरी आज सकाळी 9.15 वाजताच्या सुमारा भीषण आग लागली. या आगीत घरातील वस्तू जळाल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. आगीत सुमारे 35 ते 40 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जया शंकर झाम या टागोर चौक जवळ कुटुंबासह राहतात. सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रिजने अचानक पेट घेतल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. आगीने रौद्र रुप धारण करत घरातील कपड्याने देखील पेट घेण्यास सुरुवात झाली. जया यांनी लगेच याबाबत अग्नीशामन दलाला याची माहिती दिली. अग्नीशामन दलाचे जवान देविदास जाधव व फायटर शाम तांबे हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामन दलाच्या जवानांनी तातडीने घरातील सिलिंडर बाहेर काढले व आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील फ्रिज, फर्निचर, कपडे, इतर वस्तू असे एकूण 35 ते 40 हजारांचे नुकसान झाले आहे. फ्रिजवरील वायर शॉर्ट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.