आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गाळ्यासाठी दिलेली पगडी परत न दिल्याचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: 24 ऑगस्ट सोमवारी सतीघाट रोडवर राहणाऱ्या एका इसमाने आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या त्याने दुकानाची पगडी दुकान मालकाने परत न केल्यामुळे केली असे मृतकाच्या पत्नीचे म्हणणे आहे. याबाबत मृतकाने लिहिलेली एक चिट्ठीही मिळाली आहे. यावरून मृतकाच्या पत्नीने दुकान मालकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सतिघाट येथे राहणाऱ्या इमरान अली अयुब अली यांनी 24 ऑगस्ट सोमवार रोजी आपल्या राहते घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांनी काही दिवसांपूर्वी वणीतील जामा मस्जित परिसरात एक गाळा सुरेश तेजे यांच्याकडून 1 लाख रुपये पगडी व साडेतीन हजार रुपये महिना किरायाने घेतला होता.

लॉकडॉऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे इमरान याने पगडीचे पैसे परत मागितले. परंतु सुरेश तेजे हा पैसे देत नसल्याने इमरान याने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पत्नी शाहिदा बानो अय्युब अली हिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात सुरेश तेजे  (59) राहणार अण्णाभाऊ साठे चौक यांच्याविरोधात कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास निखिल फिटिंग करीत आहे.

गाळा परस्पर भाड्याने दिला – मस्जिद कमिटी
सदर गाळा हा कमिटीने सुरेश तेजे यांना 11 महिन्याच्या ठरावानुसार 50 हजार पगडी व अडीच हजार महिना किरायाने दिला होता. परंतु सुरेश तेजे याने कमिटीला न काळविता काही महिन्यानंतर हा गाळा परस्पर इमरान यास किरायाने दिला होता. एक वर्षाआधी येथे जिन्याचे काम करण्यासाठी म्हणून कमिटीने हा गाळा खाली करून तेथे जिन्याचे बांधकाम केले. कमिटीचा इमरान यांच्यासोबत कोणताही ठराव झालेला नाही.
– अबुल कालीम शेख कासम, जामा मस्जिद कमिटी

Leave A Reply

Your email address will not be published.