नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावात सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर व तालुका प्रमुख तथा पं. स. उपसभापती संजय आवारी यांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी 14 मे रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन दोन दिवसात कापूस खरेदी चालू न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. अखेर शिवसेनेच्या दणक्याने मारेगाव येथे सीसीआयने 18 मे सोमवारपासून कापूस खरेदी सुरू केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शेतकरी शेतमजुरांसह सामन्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच कापुस खरेदी सुद्धा बंद असल्याने शेतकऱ्याचे माल सुद्धा घरीच पडुन असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याची दखल सेनेचे घेतली होती.
जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर व तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी यांनी 14 में ला बाजार समितीत भेट देऊन, सीसीआयचे ग्रेडर, जिनिंग मालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सहकार विभागाचे अधीक्षक यांच्याशी बैठक घेऊन, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत येत्या दोन दिवसात कापूस खरेदी चालू न केल्यास, शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता.
अखेर सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या धास्तीने 18 मे रोजी कापूस खरेदीला सुरवात करून 75 गाड्याची तोलाई व ग्रेडिंग करण्यात आले, तसेच दोन दिवसात शंभर गाड्याची खरेदी चालू करणार असल्याचे संचालक मंडळांनी ग्वाही दिली.
यावेळी सेनेचे तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी, अभय चौधरी, सुनील गेडाम, राजू मोरे, राजू ठेंगणे, सुभाष बदकी, सुरेश पारखी, मुकुंद निवल, किसन मत्ते, मयूर ठाकरे, चंद्रशेखर थेरे, गोविंदा निखाडे, दुमदेव बेलेकार, आदी शिवसैनिक उपस्थित होते.