अखेर दुस-या दिवशी मनसेचे बेमुदत उपोषण सुटले

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतल्याचे जाहीर

0

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑक्टोबर सोमवारपासून मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत व वणीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते. मंगळवारी उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार बाळू धानोरकर व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या लेखी आश्वासनानंतर दुपारी 3 वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

बुधवारी दुसऱ्याच दिवशी 6 ऑक्टोबरला खासदार बाळू धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंग तुषार वारे, डॉ. पवार, सहाय्यक उपसंचालक अकोला, आनंद एंबडवार राज्य उपाध्यक्ष मनसे, वरोरा मतदारसंघाच्या आ प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली. त्यांनी राजू उंबरकर यांच्याशी मागणीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

राज्यात सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले तर राज्यातील 34 ठिकाणी मान्यता देण्यात आली. परंतु वणीतील ग्रामीण रुगांलयाची दशा व दिशा आतापर्यंत बदलली नाही. याशिवाय परसोडा येथे आरोग्याच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने ट्रामा सेंटरमध्ये जंबो कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मनसे तर्फे मागणी करण्यात आली होती.

या उपोषणाला राजू उंबरकर यांचेसह मनसेचे संतोष रोगे, फाल्गून गोहोकार, रंजित बोंडे, अनंता जुमळे, अरविंद राजुरकर, उदय खिरटकार, प्रविण नान्हे, सुरेष काळे, चंद्रकांत धोबे, मारोती डूकरे, बंडू येसेकार, शंकर पिंपळकर हे मनसे सैनिक आमरण उपोषणाला बसले होते. तसेच वणीतील विविध संघटनांनी या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.