मंगळवारी 2 मृत्यू जाहीर, तर 1 पॉजिटिव्ह

मृतक व्यक्ती मारेगाव तालुक्यातली

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मारेगाव तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. यापूर्वी 2 ऑक्टोबरला झालेल्या सुंदरनगरातील 1 मृत्यू स्थानिक प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. त्यासोबतच भांदेवाडा येथे 1 रुग्ण पॉजिटिव्ह आढळला. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 658 झाली आहे.

मंगळवारी 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे. आज 15 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 59 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 658 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 627 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या 19 झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

                                               मंगळवारी 12 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 12 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 12 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 17 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 10 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 12 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.