सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनपासून बंद असलेली वणी अडेगाव-खातेरा-वणी ही बसफेरी अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या पुढाकारात विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर डेपोने त्यांनी मागणी मान्य करून बससेवा सुरू केली. बसफेरी सुरू झाल्यामुळे आनंदीत झालेल्या विद्यार्थ्यांनी व गावक-यांनी गावकऱ्यांनी चालक व वाहकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यातील अनेक बस फे-या बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या प्रक्रियेत शाळा कॉलेज सुरू झाल्याने बससेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठी बससेवाच नव्हती. गेल्या एक महिन्यापासून अडेगाव, खातेरा, वेडद येथील विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करीत होते.
खासगी वाहनाने शाळा कॉलेजला जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. शिवाय जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ही बसफेरीचा सुरू झाल्याने याचा खडकी, अडेगाव, खातेरा, वेडद येथील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: