जितेंद्र कोठारी, वणी: अखेर वणी नगर पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले आहे. अभिजीत वायकोस हे आता वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहे. गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वणीतील मुख्याधिकारी पद रिक्त होते. तेव्हा पासून प्रभारी अधिका-यावरच इथला सर्व कारभार चालत होता. सध्या संदीप माकोडे मुख्याधिकारी झरी यांच्याकडे वणी नगर पालिकेचा प्रभार होता.
संदीप बोरकर यांची ऑगस्ट 2020 मध्ये कामठी येथील नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते व प्रभारी अधिका-यांवरच नगरपालिकेचा कार्यभार सुरू होता. आता या पदावर चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी चिखली येथील पदावरून कार्यमुक्त करून त्यांना वणी येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून रुजू होण्याचा आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.
गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त होते. झरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप माकोडे यांच्याकडे वणी नगर पालिकेचा मुख्याधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला होता. मध्यंतरी काही काळ नायब तहसीलदार महेश रामगुंडे, रविंद्र कापशीकर यांनी देखील प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. संदीप माकोडे हे वणी येथे दोन दिवस येऊन काम बघत होते. मात्र पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शहरातील विकासकामांना खिळ बसली होती. वणीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा अशी गेल्या वर्षभरापासून मागणी होती.
हे देखील वाचा:
गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत
Comments are closed.