अडेगाव येथील प्रकाश ठाकरे काव्य लेखन स्पर्धेत प्रथम

ऑनलाईन स्पर्धेत राज्यभरातील 150 कवींचा सहभाग

0

सुशील ओझा, झरी: काव्यांगण समूह नागपूर द्वारा आयोजित काव्यधारा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा 2021 मध्ये अडेगाव येथील कवी प्रकाश वासुदेव ठाकरे (पाटील) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. 10 जून ते 13 जून दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी काव्यांगण समूहाचे मुख्य प्रशासक तथा आयोजक कमलेश सोनकुसळे यांनी केले.

या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. एकूण 147 कवी तसेच कवयित्रींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून साहित्य अभ्यासक, ज्येष्ठ कवी सन्माननीय हनुमंत गोरे, सोलापूर हे उपस्थित होते. मुख्य परीक्षक साहित्यिक तथा ज्येष्ठ कवयित्री सुधाताई उ. जाधव, कोल्हापूर यांनी परीक्षण केले.

ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार व काव्यांगण समूहाचे सदस्य माननीय सुरेशचंद्र म्हात्रे, मुंबई तथा ज्येष्ठ कवयित्री जयश्री बापट, मुंबई ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला कथा कादंबरीकार मारोती मुरके यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

कविवर्य प्रकाश ठाकरे यांच्या ‘भीमराव’ या काव्याला मिळालेल्या सन्माना बद्दल समस्त ग्रामवासी, ठाकरे कुटुंबीय तथा ज्येष्ठ प्राध्यापक अमोल वा. ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा:

पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.