वणी वरोरा मार्गावर नाकाबंदी, 5 गोवंश जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी : वरोरा – वणी महामार्गावर झोला फाटा येथे नाकाबंदी दरम्यान टाटा एस मालवाहू वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असलेले 5 गोवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. वाहनात एक गाई व 4 वासरू निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून वाहतूक केली जात होती. गोवंश जनावर कतलीसाठी घेऊन जात असल्याचे संशयावरून 28 जून रोजी रात्री 10.30 वाजता नाकाबंदी ड्युटीवर असलेले पो.का. सुनील नलगंटीवार व होमगार्ड मुरस्कर यांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली होती. 

जनावरांची विना परवाना वाहतूक व निर्दयीपणे वागणूक केल्या प्रकरणी पो.का. सुनील नलगंटीवार यांच्या फिर्याद वरुन वाहन चालक सचिन पंढरी बोढाले (37) रा. राळेगाव, ता. भद्रावती, गणेश विठ्ठल सुर (28) रा. झोला, ता. वणी व प्रणित सुनील बोरतवार (23) रा.राळेगाव, ता. भद्रावती विरुद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (D) व मोटरवाहन अधिनियम कलम 192, 66 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या ताब्यातून गाई 1 किंमत 20 हजार, वासरू 4 किंमत अंदाजे 20 हजार व टाटा एस वाहन क्रमांक MH34 AV1931 किंमत 2 लाख रुपये असे एकूण 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.