अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी : यवतमाळ मार्गावर लालपुलीया भागात अपघाताची श्रृंखला सुरु आहे. गुरुवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हरी घुग्गुल (56) रा. सोमणाळा असे जखमी इसमाचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सुपरवायजर म्हणून कार्यरत हरी घुग्गुल हा आपल्या दुचाकी क्रमांक MH 29 Z 6041 ने आपल्या गावावरून वणीला येत होते. दरम्यान सोनामाता मंदिराजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत हरी घुग्गुल यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली. तर हरी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना त्वरित वणीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.

Comments are closed.