स्वातंत्र्यदिनानिमित्त शिंदोला येथे ठिकठिकाणी ध्वजारोहण

ध्वजारोहणानंतर काढण्यात आली प्रभातफेरी

0

विलास ताजने, शिंदोला: शिंदोला येथील विविध कार्यालयात देशाचा 71 वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच बबनराव मंगाम, जिल्हा परिषद शाळेत शाळा समिती अध्यक्ष मंजुषा बांदूरकार, यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर घोंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

Podar School 2025

ध्वजारोहणाला पंचायत समिती सदस्य संजय निखाडे, ग्रामसेवक प्रशांत मालोडे, तलाठी भागवत आरु, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ढोरे, वासुदेवराव नागतुरे, हरिभाऊ पिंपलशेंडे, प्रेम येरमे, रमेश टोंगे, उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न)

आदर्श विद्यालयात मुख्याध्यापक जयंत साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शकुंतला गिरी, दिलदार पठाण, कर्मचारी, विद्यार्थी,उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर बँडपथकासह गावातून प्रभातफेरी काढन्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली व घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन श्रीधर बलकी यांनी तर परेड संचलन राजेंद्र बच्चेवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.