मुकुटबनच्या आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न

राधाकृष्णाच्या वेशभूषेनं वेधले उपस्थितांचे मन

0

देव येवले, मुकुटबन: श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या निमित्त बुधवारी 16 ऑगस्टला मुकुटबन इथल्या आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चिमुकल्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लता गादेवार व प्रमुख पाहुणे निलेश चौधरी, निनान चेरीयन होते. तर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. कल्पना पवार यांनी धुरा सांभाळली.

(नगर पालिका क्र. 5 शाळेत देशभक्ती गीत गायण स्पर्धा)

कार्यक्रमाच्या संचालनाची जबाबदारी ममता हांडे व मनीषा तिपतीवार यांनी सांभाळली. तर आभार प्रदर्शन सपना उमरे यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.