पूरग्रस्तांच्या मदतीकरिता झरी सरसावली

तहसील कार्यालयात मदतनिधी केंद्र सुरू

0

सुशील ओझा, झरी: सरकारने तालुका पातळीवर मुख्यमंत्री सहायता निधी केंद्र झरी तहसील कार्यालयात सुरू केले. सततच्या मुसळधार पावसामुळे हाहाकार केला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर व सांगली येथे महापूर येऊन संपूर्ण गाव पाण्याखाली आले. येथील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले. जनतेसह जनावरे पुरात मृत्युमुखी पडले.लाखो लोकांच्या घर उद्धवस्त होऊन रस्त्यावर आले आहे. शासनाकडून तसेच राज्यातून सामाजिक संघटना व सामान्य माणुससुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक व इतरही मदत करत आहे

इथे पूरग्रस्तांना मदत करणाऱ्यांची धनादेश स्वीकारले जातील. इच्छुकांनी आपले योगदान करण्याचे आवाहन तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांच्यासह महसूल विभागाने केले आहे. तसेच धनादेश देण्याकरिता अडचण किंवा इतर अडचणी निर्माण झाल्यास ९७६७३३९०३९, ८३२९७७५१४४, व ९६८९३७२७१५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.