बेरोजगारी एक भीषण सामाजिक समस्या – संदीप गोहोकार

युवकांमध्ये वाढत चाललेल्या बेरोजगारीवर प्रकाश टाकणारा लेख

0

बेरोजगारी एक भीषण सामाजिक समस्या – संदीप गोहोकार
आज आपल्या देशात एखाद्या महामारी प्रमाणे बेरोजगारी वाढत आहे. आज कधी नव्हता एवढा उच्चांक बेरोजगारीने गाठला आहे. सरकारीच नव्हे तर खाजगी क्षेत्रात ही काम मिळणं कठीण झालं आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. त्याचा फटका बसून खाजगी क्षेत्रातील हजारो लोकांना कामा वरून काढण्यात आले, अशी भीषण परिस्थिती असताना सरकार मधले काही लोक म्हणतात कि देशात काम खूप आहे. पण इथला युवक ते काम करत नाही. यांच्या म्हणण्या प्रमाणे देशात कोणते काम आहे? पकोडे तळण्याचे का? बेरोजगारी म्हणजे का ? आपण बेरोजगारीची व्याख्या कशी करतो. त्या वरून कोणाला आणि कोणते काम आहे, हे लक्षात येईल. “ज्याला त्याच्या गुणवत्ते प्रमाणे सन्मानाने काम व योग्य दाम मिळत नाही तो बेरोजगार” हे बेरोजगारीच प्रमाण सातवी ते पदवीधर वर्गात जास्त आहे. कारण शिकलेल्या युवकांनी विशिष्ठ अशा कामाचं प्रशिक्षण घेतलं असते. सरकारने घालून दिलेल्या अटी प्रमाणे त्या पदानुसार एक पात्रता असते. त्यानुसार काम मिळायला पाहिजे. हि मंडळी विद्यार्थ्याला पकोडे तळाचे काम सांगतात तर असा प्रश्न येत कि त्याने पकोडे तळाच प्रशिक्षण घेतलं होतं का ?. ही थट्टा झाली !

अशाने त्याला रोजगार तर मिळणारच नाही पण त्याच्या ज्ञानचा योग्य फायदा हि देशाला होणार नाही . त्याचाच परिणाम एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या युवकांचे रिकामे हात आज देशाच्या विकासाला लागले नाही. बेरोजगारी हि पूर्वी पासून नव्हती किंवा ती नैसर्गिक समस्या ही नाही , ती इथल्या ध्येय धोरणातून निर्माण झालेली समस्या आहे . कारण आज सार्वजनिक क्षेत्रातील (public sector) गुंतवणूक सरकार कमी करीत आहे .

सोबतच देशातील गृहगुंतवनुकिच {domestic investment} प्रमाण हि कमी आहे. सरकार आपल्या जबाबदाऱ्या झटकत आहे. परिणामी सार्वजनिक क्षेत्रात वाढ न होता उलट ते कमी होताना दिसत आहे. खाजगी क्षेत्रात जी थोडीफार गुंतवणूक होत आहे . पण त्याने त्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं म्हणता येणार नाही . त्यात महत्वाचं म्हणजे खाजगी क्षेत्रातील उत्पन्न वर व संपत्तीवर मोजक्या लोकांचा ताबा आहे . त्याचा हि फटका बसून सार्वजनिक क्षेत्र कमी होत गेलं आहे.

आता या क्षेत्रात गुंतवणूक का नाही ? कारण नफा नाही.नफा का नाही ? कारण उत्पादन नाही . उत्पादन कां नाही ? कारण मागणी नाही. मागणी का नाही ? कारण क्रयशक्ती कमी झाली आहे .लोकांन कडे पैसे₹ नाही . पैसा₹ का नाही ? कारण बेरोजगारी वाढली आहे . आता पाहा मुद्दा बेरोजगारी वरून सुरु होऊन विकासाला विळखा घालून तिथंच बेरोजगारी वर येऊन थांबला . म्हणजे लोकानं च्या हातात येणाऱ्या पैस्या वरून गुंतवणूक व देशाचं होणारा विकास ठरतो .

हे एक चक्र आहे, या चक्राव्युवात भारत देश अडकला आहे . या चक्रातून मार्ग काढण्यासाठी सरकारला पुढे येऊन सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल . कारण सरकार च काम नफा कमविणे नाही,तर न्याय देणे आहे . त्यासाठी बेरोजगारी च्या प्रश्नांना कडे जनतेचे लक्ष असणे आवश्यक आहे व याला आपला प्राथमिक मुद्द्याला बनविणे गरजेचे आहे . आपली समस्या व मुद्दे आपल्याला माहीत असले पाहिजे नाही तर आपण कोणाच्याही भटकविल्याने भटकून जाऊ आणि भलत्याच मुद्द्यांवर भांडत बसू . कारण आज वेगवेगळया पद्धतीच्या प्रचारातून दुसरेच मुद्दे चर्चेला येत आहे .आपण ही त्या प्रचाराला बळी पडत अहो का ? याचा विचार करा . आता पुढे निवडणुका आहे. युवक मित्रानो तुह्मी आपला मुद्दा लक्षात ठेवा. बेरोजगारी मुद्दा पक्षाच्या जाहिरनाम्या वर आहे का! ते पहा . हे लोक सर्व साधनां चा वापर करून वेगवेगळे मुद्दे तयार करून चर्चेत आणतील,पण तुम्ही आपल्या मुद्द्या वर लक्ष ठेऊन राहा .

मतदान आपलं, मुद्दा आपला…
संदीप गोहोकार
9921191124

(लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. त्या विचारांशी संपादक सहमत असेलच असे नाही.)

Leave A Reply

Your email address will not be published.