भरधाव कारची ऑटोला धडक, गर्भवती महिलेस 3 जखमी

यवतमाळ रोडवरील घटना, धडक देऊन कारचालक पसार

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवर एका भरधाव कारने प्रवासी घेऊन जाणा-या ऑटोला जबर धडक दिली. यात तीन प्रवासी जखमी झालेत तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. जखमीत एका 8 महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास शेवाळकर परिसरच्या गेट समोर ही घटना घडली. धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ऑटो चालकाच्या तक्रारीवरून कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आकाश राकेश यादव हा राजूर येथील रहिवासी असून तो ऑटो चालविण्याचे काम करतो. 26 जानेवारी रोजी ते आपला ऑटो (MH29 V9296) मध्ये तीन प्रवासी घेऊन तो राजूर वरून वणीच्या दिशेने निघाला. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास शहरातील शेवाळकर परिसर गेट मधून एक भरधाव फोर्ड कार (MH 29 BC 4483) निघाले. या वाहनाने ऑटोच्या मागून धडक दिली. या धडकेत ऑटो पलटी झाला.

धडक देताच फोर्ड वाहन चालकाने कोणतीही मदत न करता तेथून पळ काढला. या अपघातात एक 26 वर्षीय गर्भवती महिला, एक 48 वर्षीय महिला व चालक आकाश यादव जखमी झाला. तर मो. शरीफ रहीम बकश हा प्रवासी किरकोळ जखमी झाला. जखमींनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतला व त्यानंतर वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 279, 337, 338, 134/ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोहेकॉ जगदीश बोरणारे करीत आहे.

हे देखील वाचा: 

शिवपुराण कथेत चोरट्यांची चांदी, लाखोंचा ऐवज लंपास

Comments are closed.