विवेक पिदूरकर, शिरपूर: शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी नाकाबंदीत चार जणांवर दारूची तस्करी केल्या प्रकरणी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक चारचाकी व तीन दुचाकी जप्त असा एकूण सुमारे साडे सात लाखांचा मु्द्देमाल जप्त केला आहे. गेल्या दोन महिन्यात शिरपूर पोलिसांनी अवैध दारू तस्करीबाबत धडाकेबाज कामगिरी करत 40 पेक्षा अधिक कार्यवाही केल्या आहेत.
सध्या 31 आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु तस्करीसंदर्भात ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात बेलोरा व चारगाव चौकी येथे नाकाबंदी केली आहे. शनिवारी शिरपूर पोलिसांनी नाकेबंदी करून चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांना अटक केली आहे. कार्यवाहीत एक टाटा झेनॉन व तीन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 65 (अ) व (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर पोलिसांची दारु तस्करीविरोधात टाच
गेल्या दोन महिन्यात शिरपूर पोलिसांद्वारे अवैध दारू विक्री प्रकरणी 41 कार्यवाही करण्यात आल्या आहेत. सदर कार्यवाही या 1 नोव्हेंबर 2020 ते 27 डिसेंबर 2020 दरम्यान करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण कार्यवाहीत सुमारे 14 लाख 4 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 41 जणांना अटक करण्यात आली आहे.
शनिवारी झालेली कार्यवाही ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोउनि धावळे, नापोकॉ सुगत दिवेकर, प्रमोद जुनुनकर, अमोल कोवे, गुणवंत पाटील, अनिल सुरपाम यांनी पार पाडली.
हे पण वाचा:
हे पण वाचा: