ठगबाज महिलेचा शहरात धुमाकुळ, टोळी सक्रीय असण्याची शक्यता

शहरातील दुकानदार टारगेट, 8-10 दुकानदारांना गंडा

जितेंद्र कोठारी, वणी: एका ठकबाज महिलेने शहरात सध्या धुमाकुळ घातला असून या महिलेने सहका-याच्या मदतीने आतापर्यंत तब्बल 8 ते 10 दुकानदारांना आर्थिक गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या लुटारु टोळीने बहुतांश महिला दुकानदारांना आपले टारगट बनविले आहे. या ठकबाज महिलेच्या टोळीमध्ये 2 पुरुष असल्याचीही चर्चा आहे. या लुटारु महिलेच्या शिकार झालेल्या एकाही दुकानदाराने अद्याप पोलिसात तक्रार दिली नसल्याची माहिती आहे.

नांदेपेरा मार्गावरील सहारा प्रॉव्हिजन, पटवारी कॉलनीमधील काशीनाथ मेडिकल स्टोर व चिखलगाव येथील ओम साई प्रॉव्हिजन दुकानासह इतर काही ठिकाणी या ठकबाज टोळीने मागील 15 दिवसात दुकानदारांना 2 हजाराचा चुना लावला आहे. विशेष म्हणजे ज्या दुकानाच्या काउंटरवर महिला किंवा मुलगी बसून असते त्याच दुकानाला या टोळक्याने लक्ष्य बनविले आहे.

पीडित दुकानदारांनी सांगितल्या प्रमाणे तोंडावर स्कार्फ बांधलेली एक महिला दुकानातून शंभर दीडशे रुपयांचा सामान घेऊन दुकानदाराला 2 हजाराचा नोट देते. उर्वरित पैसे परत घेतल्यानंतर लगेच त्या महिलेचे सहकारी असलेले दोन पुरुष दुकानात पोहचते व घाई असल्याचे दाखवून विविध सामानांची मागणी करतात. दरम्यान काउंटरवरील महिला दुकानदारचे लक्ष भरकटवून दिलेली 2 हजारांची नोट परत घेऊन त्या ठकबाज महिला ग्राहक तिथून पसार होते.

छोटी रक्कम म्हणून दुकानदार या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. असा प्रकार 8 ते 10 दुकानदारांसोबत झाल्याची माहिती आहे. या पुढे जर दोन हजारांची नोट घेऊन कुणी 100-150 रुपयांचे सामान मागितल्यास सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा:

आबड भवनला भीषण आग, फर्निचर्सचे दुकान जळून खाक

Comments are closed.