यवतमाळ रोडवर तरुणांच्या दोन गटात राडा

शुक्रवारी रात्री 10 वाजता घडला थरार... वचपा काढण्यातून शहरात सातत्याने राडा

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री 10 वाजता दरम्यान शेवाळकर परिसराच्या गेट समोर दोन तरुणांमध्ये फ्री स्टायल झाली. मारहाण होत असताना दोघांचे नातेवाईक व मित्र तिथे पोहचले व त्यांनी समजूत काढून वाद मिटविला. मारहाण करणारे तरुण राजूर व माजरी येथील असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजूर येथील युवकाला दोन दिवसांपूर्वी माजरी येथील एका तरुणाने शिवीगाळ केली होती. त्यावेळी राजूर येथील युवक काही न बोलता तिथून निघून गेला. शुक्रवारी रात्री 10 वाजता सुमारास माजरी येथील तरुण आपल्या मित्रांसह शेवाळकर परिसरच्या गेटसमोर उभा होता. दरम्यान राजू येथील तरुण वचपा काढण्यासाठी त्याच्याजवळ जात शिवीगाळ का केली असे म्हणत त्याला मारहाण केली. दोघात फ्री स्टायल सुरु असताना दोघांचे नातेवाईक व मित्र तिथे पोहचले व त्यांनी वाद मिटवून दोघांना घरी पाठविले. त्यामुळे प्रकरण तिथेच मिटले. 

वचपा काढण्यातून शहरात सातत्याने राडा
वणीमध्ये मागील काही काळापासून शालेय विद्यार्थी तसेच तरुणांमध्ये क्षुल्लक कारणांवरून खटके उडत आहे. दामलेफैल व सेवानगर भागातील दोन टोळीमध्ये धुसपुस सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी सेवानगर येथील एका तरुणावर दामलेफैल परिसरातील दोघांनी चाकू हल्ला केला होता. तर त्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी 3 दिवसांपूर्वी सेवानगर येथील 3 ते 4 तरुणांनी दामलेफैल परिसरातील तरुणावर शेवाळकर परिसरमध्ये जीवघेणा हल्ला केला.

True Care

पोलिसांनी वेळीच अशा प्रकारावर आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा वणीत टोळीयुद्द वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा:

नांदेपेरा रोडवरील मटका जंत्रीवर यवतमाळ पोलीस पथकाची धाड

अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!