बहुगुणी डेस्क, वणी: भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी अशी दशसूत्री देणारे तथा आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे संत गाडगेबाबा यांचा 148 वा जन्मोत्सव गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता होईल. मुख्य आयोजक धोबी समाज सामाजिक सांस्कृतिक संस्था तथा सहआयोजक सल्लागार समिती ड्रायक्लिन प्रेस असोसिएशन वणी, महिला समिती, धोबी समाज सामाजिक सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संत गाडगेबाबा जयंती उत्सव साजरा होत आहे.
ब्राह्मणी फाट्यावरील निळापूर रोड येथील श्री संत गाडगेबाबा स्मारक येथे सर्व कार्यक्रम होतील. यानिमित्त सायंकाळी 4 वाजता गाडगेबाबा चौक ते गाडगेबाबा स्मारक इथे पदावली आणि वारकरी भजनासह शोभायात्रा निघेल. समाजातील मुलं मुली सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. यावेळी राजू तुराणकर, प्रदीप मुके, बंडू महाकुलकर, राजेंद्र क्षीरसागर, अरविंद क्षीरसागर. शेखर चिंचोळकर, विठ्ठल केळवतकर, विठ्ठल महाकुलकर, कैलास बोबडे, दीपलाल चौधरी, ज्ञानेश्वर भोंगळे, प्रवीण वाघमारे, डी. डी. म्हस्के, बंडू मोतेकर, बबन चिंचोलकर, बाळूभाऊ तुराणकर, सुनील दाडे, भास्कर दाडे, कलाश्री क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या कार्यक्रमात एकल नृत्य, समूह नृत्य, गायन, अभिनय असे विविध सादरीकरण होतील. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता महास्वच्छता अभियान होईल. सकाळी 9 वाजता संत गाडगेबाबांच्या स्मारकाला हारार्पण होईल. श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीच्या सौजन्याने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सकाळी 10 वाजता रुग्णांना फळवाटप होईल. विशेष म्हणजे मागील 21 वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. सकाळी 10 वाजता सुमित बिहारी यांच्या व्यवस्थापनात रक्तदान शिबिर होईल.
प्रखर विचारवंत तथा प्रबोधनकार लक्ष्मणदास काळे यांचे ”संत गाडगेबाबा यांच्या विचारांची समाजाला गरज” या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमात सूत्रसंचालन उमाकांत भोजेकर करतील. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे या महोत्सवाचे उद्घाटन करतील. यावेळी तारेंद्र बोर्डे, वामनराव कासावार, विजयबाबू चोरडिया, राजू उंबरकर, देविदास काळे, राकेश खुराणा, इजहार शेख, अजित जाधव, निखिल धुळधर, सचिन गाडे, संजय खाडे, विजय मुकेवार, सुनील कातकडे, जमीर खान, नारायण गोडे, रवी रेभे, राहुल गोपाल चौधरी, कवडू दुरुतकर, रमा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती आयोजन समितीचे अध्यक्ष राहुल चौधरी, उपाध्यक्ष अनिल खीरकर, सचिव संजय चिंचोळकर, सहसचिव सारंग बिहारी, कोषाध्यक्ष जनार्दन थेटे, सहकोषाध्यक्ष विनोद चिंचोलकर, सदस्य विजय वाघमारे, ज्ञानेश्वर डोळसकर, भरत बोबडे, रोशन चिंचोलकर, महेश बोबडे, धनराज हिवरकर, प्रशांत पत्रकार, मंगेश चिंचोलकर, पवन बोबडे, सचिन क्षीरसागर यांनी केली आहे
Comments are closed.